Description
सामान्यतः एखाद्याच्या मनाप्रमाणे झाले नाही, किंवा इतर व्यक्ती त्याला समजू शकली नाही, किंवा दृष्टीकोनात फरक असला तर माणूस क्रोधित होतो. बऱ्याचवेळा जेंव्हा आपल्यावर चुकीचे असल्याचा आरोप होतो आणि आपल्याला वाटते की आपण बरोबर आहोत, तेंव्हा आपल्याला क्रोध येतो. आपल्या दृष्टिकोनामुळे आपल्याला वाटते की आपण बरोबर आहोत, आणि दुसऱ्या व्यक्तीला वाटते की तिचे बरोबर आहे. बऱ्याचवेळा जेंव्हा पुढे काय करायचे याची कल्पना नसते, दूरदृष्टी किंवा अंतर्ज्ञान ( इंट्यूशन्) नसते, तेंव्हा आपण क्रोधित होतो. जे लोकं आपल्यावर सर्वात जास्ती प्रेम करतात अशांशी आपण संबंध खराब करून घेतो. आपण आपल्या मुलांना सर्व आधार, सोटी व सुरक्षा देऊ इच्छितो, पण आपल्या क्रोधामुळे मुले स्वता:च्या च घरात घाबरतात. क्रोधी लोकांशी कसे वागावे? जेंव्हा मशीन खूप गरम होते, तेंव्हा काही वेळ ते तसेच ठेवावेच लगते, मग ते थोड्याच वेळात थंड होईल. पण त्याचात जर तुम्ही व्यत्यय आणलात तर तुम्हाला चटका बसू शकेल. क्रोध आणि आपले क्रोधसंबंधी समस्यांचा समाधानासाठी पुढे वाचा …