• INR
Close

Books

  • Picture of चमत्कार - मराठी (Marathi)

चमत्कार - मराठी (Marathi)

आजच्या या युगात जिथे विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे तिथे लोकांमध्ये अद्यापही चमत्कार आणि मंत्रतंत्र, या संबंधित भ्रामक मान्यता प्रचलित आहेत.

Rs 20.00

Description

आजच्या या युगात जिथे विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे तिथे लोकांमध्ये अद्यापही चमत्कार आणि मंत्रतंत्र, या संबंधित भ्रामक मान्यता प्रचलित आहेत. चमत्काराचा अर्थ आहे आपल्या समजूती पलीकडील अद्वितीय शक्तीचे अस्तित्व असणे. आपल्या भारत देशात लोकांना धर्म आणि चमत्कारच्या नावाने भ्रमित करणे खूप सोपे आहे, कारण अनिच्छनीय घटनेपासून स्वत:ला वाचवण्यासाठी लोक अशा गोष्टींवर सहज विश्वास करतात. ज्ञानी पुरुष दादा भगवान आपल्याला या चमत्कारामागे दडलेल्या सत्याची जाणीव करुन देतात आणि चमत्कार व सिद्धी याच्यातला फरक स्पष्ट करतात. सामान्यत: माणसांना उद्भवणारे प्रश्न जसे की चमत्कार कोण करतो? ते कशा प्रकारे आपल्या जीवनाला प्रभावित करते? चमत्कार करुन आपण देवाला प्रसन्न करु शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकात सापडतात. दादाश्री स्पष्टपणे हेच सांगू इच्छितात की आत्मा या सर्व गोष्टींहून पर आहे आणि आत्मशाक्षात्कार हाच मोक्ष प्राप्त करण्याचे एकमेव साधन आहे. आध्यात्मिकता आणि चमत्कार, या मधील नेमका फरक समजण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे.

Read More
success