Description
सुखी व चांगले जीवन जगण्यासाठी पैसा हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. परंतु आपण कधी असा विचार केला आहे की एखाद्याकडे पुष्कळ पैसे असतात, तर एखाद्याकडे बिलकूल नसतात, असे का? परम पूज्य दादाश्रींना नेहमीच वाटायचे की पैशांच्या व्यवहारात नैतिकता असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वत:च्या अनुभावातून आणि ज्ञानाच्या मदतीने ते पैशांचे येणे-जाणे, फायदा-तोटा, देणेघेणे इत्यादी बाबतीत सविस्तरपणे जाणत होते. ते म्हणायचे की मनाच्या शांती आणि समाधानासाठी कुठल्याही व्यापारात खरेपणा आणि प्रामाणिकते सोबत नैतिक मूल्य असणे अत्यंत गरजेचे आहे. ज नसल्यामुळे, जरी आपल्याकडे पुष्कळ धन असले तरी आत सदैव चिंता व व्याकुळता वाटत राहते. आपल्या वाणीद्वारे दादाश्रींनी पैशांच्या बाबतीत होणार्या संघर्षातून कसे मुक्त व्हावे आणि समाधानपूर्वक व प्रामाणिकपणे आपला पैशा संबंधित व्यवहार कसा पूर्ण करावा याचे सुंदर वर्णन केले आहे जे आपण या पुस्तकात वाचू शकाल.